रूग्णालयात उपचार सुरू असताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना काय केली विनंती?
छत्रपती संभाजीनगर, ३ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आक्रमक तरूणांनी राज्यात काही ठिकाणी जाळपोळ केल्याचे प्रकार पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांकडून अटक सत्र सुरू आहे. यामध्ये काही निष्पाप तरूणांचा देखील बळी जातोय, असा दावा केला जातोय. त्यामुळे हे अटक सत्र थांबवावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘कायदेशीर […]
छत्रपती संभाजीनगर, ३ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आक्रमक तरूणांनी राज्यात काही ठिकाणी जाळपोळ केल्याचे प्रकार पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांकडून अटक सत्र सुरू आहे. यामध्ये काही निष्पाप तरूणांचा देखील बळी जातोय, असा दावा केला जातोय. त्यामुळे हे अटक सत्र थांबवावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘कायदेशीर मार्गानं तरूण आंदोलन करत आहे. मात्र मुद्दाम त्यांना प्रशासनाकडून टार्गेट केले जात आहे. त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने सूचना करून शांततेत आंदोलन करणाऱ्यांवरील कारवाई थांबवण्यात यावी. विनाकारण निष्पाप तरूणांवर कारवाई करून त्यांना मारझोड करणं थांबवा. राज्य शांत आहे ते अशांत होऊ नये याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी. ‘