खानदानी मराठ्यांची ही संस्कृती नाही, जरांगे पाटील सभेला आलेल्या मराठ्यांवरच भडकले
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आपल्या नाशिक दौऱ्याची सुरुवात केली. नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर दौऱ्यात त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शेणी येथे भाषणादरम्यान मनोज जरांगे भडकल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक, २२ नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन आपल्या नाशिक दौऱ्याची सुरुवात केली. नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर दौऱ्यात त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पाथर्डी फाटा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जरांगे पाटील पुढे रवाना होत शेणी येथे दाखल झालेत. यावेळी त्यांनी सभा घेतली. या सभेत मराठ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर काही मराठा तरूणांनी आरडा-ओरड केली. यानंतर मनोज जरांगे पाटील त्या तरूणांवरच भडकले. खानदानी मराठ्यांची ही संस्कती नाही, असे जरांगे म्हणाले. तर मराठा समाज आरक्षणाच्या न्यायासाठी अनेक वर्षांपासून झुंज देतोय. मराठा समाजाला आरक्षण होतं. तरीही ते जाणून बुजून दिलं गेलं नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

