“उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलंय”; भाजप खासदाराचा हल्लाबोल
‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे. यावरून भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीका केली आहे.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. देशातील महत्वाच्या विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे. यावरून भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी पहिला आपला पक्ष सांभाळावा. मग इंडियाची बैठक घ्यावी.महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं. आज मुंबईकरांना सेवा मोदी देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधीच हिंदुत्व सोडलं आहे.त्यामुळे त्यांचा काही हिंदुत्वाशी संबंध येत नाही. ”
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

