महाराष्ट्रानं ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांची माहिती दिली नाही: मनसूख मांडवीय

महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI