औरंगाबादच्या क्रांती चौकातून निघाला मराठा क्रांती मोर्चा; काय आहेत मागण्या?
शहरातून आज मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला.
औरंगाबाद, 09 ऑगस्ट 2023 | शहरातून आज मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. आरक्षणाच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा पुकारला आहे मोर्चात सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने चेंबूर पांजरापोळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील हायवे जॅम करण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

