Maratha Reservation : 111 एकरवर भव्य सभा, हिंगोलीतील मैदान मराठ्यांनी हाऊसफुल्ल, जिथं नजर तिथं भगवं वादळ
हिंगोलीत तब्बल 111 एकर मध्ये ही सभा पार पडत आहे. गर्जवंत मराठ्यांचा लढा असा या 20 बाय 40 च्या व्यासपीठाला नाव देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे तर याच गर्जवंत मराठाच्या व्यासपीठावरून मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांना संबोधित करणार
हिंगोली, ७ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची आज जाहीर सभा हिंगोली येथे होत आहे. हिंगोलीत तब्बल 111 एकर मध्ये ही सभा पार पडत आहे. गर्जवंत मराठ्यांचा लढा असा या 20 बाय 40 च्या व्यासपीठाला नाव देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे तर याच गर्जवंत मराठाच्या व्यासपीठावरून मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांना संबोधित करणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या सभेकरता सकाळपासूनच हिंगोलीसह इतर काही जिल्ह्यातूनही मराठे मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच मराठ्यांनी हिंगोलीतील सभा स्थळ हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टेजच्या खाली मनोज जरांगे पाटील यांची 35 बाय 40 जागेमध्ये रांगोळीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचं रांगोळीच्या माध्यमातून चित्र रेखाटले आहे. जे चर्चेचा विषय ठरत आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

