Special Report | शरद पवार आणि अनिल परब यांच्याकडेही एसटीवर तोडगा नाही?

या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदत घेऊन ही माहिती दिली. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावर संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबईः अखेर अतिशय ताणलेल्या आणि चिघळलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी साडेचार तास ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. मात्र, या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदत घेऊन ही माहिती दिली. यामुळे मुंबईतल्या आझाद मैदानावर संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी परब जर रोज तेच-तेच बोलत असतील, तर त्या बैठकीला अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI