नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत तिढा. शिक्षक मतदारसंघात शिंदेंचाही उमेदवार आणि अजित दादांचाही उमेदवार. एकनाथ शिंदे नाशिकचा पेच सोडवणार? जाणून घ्या सविस्तर
Vidhansabha Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी तर अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सध्या महायुतीत पेच निर्माण झाला आहे. महायुतीचे 2 उमेदवार समोरासमोर लढल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र नाशिकचा हा पेच सोडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. किशोर दराडेंसाठी एकनाथ शिंदे नाशिक, शिर्डी, जळगावात बैठक घेणार आहेत. मात्र सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे उमेदवार मागे घेण्यासाठी अजित पवारांना विनंती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे अपक्ष विवेक कोल्हे नाशिकमध्ये महायुतीला डोकेदुखी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

