Mumbai Local Mega Block : रविवारी ट्रेननं प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर 5 तासांचा ब्लॉक, असं करा नियोजन
रविवारी, मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर झाला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंत आणि हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:०५ ते संध्याकाळी ५:०५ पर्यंत हा ब्लॉक राहील.
उद्या रविवारी मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या रविवारी, मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. ही माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यानच्या जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंत पाच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. तर, हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११:०५ ते संध्याकाळी ५:०५ पर्यंत हा मेगा ब्लॉक राहील. या कालावधीत या मार्गांवरील रेल्वेसेवा बंद राहील. प्रवाशांना या मेगा ब्लॉकमुळे असुविधा होऊ शकते, त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

