दुधाला उकळी ! २ रूपयांची वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडणार
सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा एकदा होणार रिकामा, दुधाच्या किरकोळ विक्रीत २ रूपयांची वाढ
मुंबई : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा एकदा रिकामा होणार आहे. कारण दुधाच्या किरकोळ विक्रीमध्ये २ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट थोडं हलणार असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताणा पडणार आहे. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने दुधाच्या किरकोळ विक्रीमध्ये २ रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर दूध दरवाढ आजपासून लागू करण्यात येणार आहे. एकीकडे आज केंद्रातील मोदी सरकार आर्थिक वर्ष 2023-2024 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प असून पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे लक्ष लागले असताना राज्यात दुधाच्या किरकोळ विक्रीत दोन रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

