पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप
शिंदे गट शिवसेनेतील नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी 90 लोकांच्या जमिनी हडप केल्याचा गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. इतकंच नाहीतर हडप केलेल्या जमिनींमध्ये सैनिकांच्या जमिनींचा देखील समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : मी पण एक बॉम्ब आणलाय, अधिवेशनात बॉम्ब फोडणार असं मोठं वक्तव्य काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आज त्यांनी शिंदे गटातील नेत्यावरच निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. शिंदे गट शिवसेनेतील नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी 90 लोकांच्या जमिनी हडप केल्याचा गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. इतकंच नाहीतर हडप केलेल्या जमिनींमध्ये सैनिकांच्या जमिनींचा देखील समावेश असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यामुळे याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचा इशाराही अब्दुल सत्तार यांना कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे. तर आपल्या राज्यातील काही नेते, मंत्री त्यांच्या भागाला बिहार बनवत आहेत असे म्हणत याचे उदाहरण देताना कैलास गोरंट्याल यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव घेत गंभीर आरोप केले.