Chhagan Bhujbal : मी काय येडगावहून आलोय? झाले मला 25 वर्ष… नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने नाशिककर त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याचे काम सुरू असताना या कामाची भुजबळांकडून पाहणी झाली तर भुजबळांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलेत
मंत्री छगन भुजबळ यांचा नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप पाहायला मिळाला. नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रूपी करणावरून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि याच कारणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तर सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने छगन भुजबळांनी अधिकाऱ्यांना झापले असल्याची माहिती आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज शनिवारी नाशिकच्या द्वारका सर्कलची पाहणी केली. नाशिकच्या द्वारका सर्कलमुळे गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडी होताना दिसतेय. नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याचे काम सुरू आहे. याच पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना छगन भुजबळ यांनी धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. मंत्री भुजबळांच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू झाली आहे.

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
