AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण? कोणाला 10 मिनिटं उशीर, कोणी स्वतःला ब्लँकेटमध्ये लपेटलं अन्...

Ahmedabad Plane Crash : मृत्यूला चकवा देणारे ‘ते’ तिघं कोण? कोणाला 10 मिनिटं उशीर, कोणी स्वतःला ब्लँकेटमध्ये लपेटलं अन्…

Updated on: Jun 14, 2025 | 11:16 AM
Share

अहमदाबादमध्ये गुरुवारी भीषण विमान अपघात झाला. या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेना जाण्यासाठी निघालेलं विमान अहमदाबाद येथून टेकऑफ होताच अवघ्या काही क्षणात कोसळलं

अहमदाबादमध्ये झालेल्या भयानक एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर तीन जण थोडक्यात बचावलेत. दैव बलवत्तर म्हणून आज या तिघांचा जीव वाचला असंच म्हणता येईल. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानी परिसरात 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान लंडनकडे जात असताना अवघ्या 40 सेंकदातच ते कोसळले. . टेक ऑफनंतर विमान सुमारे 600 फूट उंचीवर गेले आणि त्यानंतर अचानक खाली पडले. यामुळे मोठं नुकसान झालं. अपघात झालेल्या विमानातील 241 प्रवासी मृत्यूमुखी पडले तर एक प्रवासी जीवंत राहिल्याची माहिती आहे. त्याचं नाव रमेश विश्वासकुमार असं आहे. मात्र असे आणखी तीन जणं आहेत त्याचा जीव गेला असता पण काहीतरी अडचण आली, कोणी प्रसंगवधान दाखवलं आणि आज ते सुखरूप आहे. कोण आहेत ते तिघं ज्यांनी मृत्यूलाच चकवा दिला, बघा व्हिडीओ

Published on: Jun 14, 2025 11:14 AM