AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : राज्यात नवा वाद होणार? मंत्री छगन भुजबळ यांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं काय आहे बोलणं?

Chhagan Bhujbal : राज्यात नवा वाद होणार? मंत्री छगन भुजबळ यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, नेमकं काय आहे बोलणं?

| Updated on: Nov 06, 2023 | 10:38 AM
Share

Chhagan Bhujbal Viral Audio Clip : आरक्षणाच्या वादावरून झालेली बीडमधील जाळपोळ शांत होत नाही तर आता मंत्री छगन भुजबळ यांच्या एका ऑडिओ क्लिपने राज्यात नवा वाद निर्माण होणार? बघा काय आहे छगन भुजबळांची ती क्लिप... मात्र टिव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही.

मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | आरक्षणाच्या वादावरून झालेली बीडमधील जाळपोळ शांत होत नाही तर आता मंत्री छगन भुजबळ यांच्या एका ऑडिओ क्लिपने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता करेंगे मरेंगे…असं म्हणत या कथित व्हायरल क्लिपमध्ये छगन भुजबळ आपल्या समर्थकांना उभं राहण्यासाठी सांगताना दिसताय तर आता तुम्ही आवाज उठवा, मी एकटा कुठपर्यंत लढणार, असे म्हणत भुजबळांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. असंही मरतोय आणि तसंय मरतोय…आपण आता उभं राहिला पाहिजे… असं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. एकीकडे सरकार समिती नेमून वेगवेगळ्या समूहामध्ये सामंजस्याची हमी देतेय मात्र दुसरीकडे सरकारच्याच मंत्र्याचे सूर करेंगे या मरेंगे असं उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. बघा काय आहे ती क्लिप… मात्र टिव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही.

Published on: Nov 06, 2023 10:38 AM