Special Report | आर्यन खानची सुटका, आता समीर वानखेडेंना टेन्शन!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जेलमधून सुटला तर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण जात प्रमाणपत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जेलमधून सुटला तर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण जात प्रमाणपत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे समोर आले आहेत. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रांची कुणी तक्रार केल्यास चौकशी करु, असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दुसरीकडे समीर वानखेडे स्वत: राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांच्या भेटीला पोहोचले. वानखेडेंनी अरुण हलदर यांची भेट घेऊन जात प्रमाणपत्राचे कागदपत्रे दाखवली. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI