संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही अन् तोंडाला लगाम नाही; भाजप नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | 'येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय दिवे लावता हे दाखवावं', भाजप नेत्याचं महाविकास आघाडीला खुले आव्हान
जळगाव : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेचं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच भाजप नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही, ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा काही नेम नाही, असे वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, कसब्यातील एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला असे समजायचे कारण नाही, तर येणार्या महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये काय दिवे लागतात हे दाखवावं असे म्हणत त्यांनी संजय राऊतांसह महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

