Mangal Prabhat Lodha : माझं समर्थन नाही पण… कबुतरखाना हटवण्यावरुन जैन समाज आक्रमक, मंत्री लोढा स्पष्टच म्हणाले
दादर कबुतरखाना परिसरात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. आणि त्यांनी कबुतरखाना सुरू करावा अशी मागणी केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
मुंबईच्या दादर येथील कबूतर खाना परिसरात आज जैन समाजाने आक्रमक होत आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेने बंद केलेला, झाकलेला कबुतर खाना उघडा करण्याचा प्रयत्न केला. कबुतरखान्यात दाणे टाकण्यास परवानगी नसताना आज काहींनी दाणे टाकले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतर खाना बंद केला होता. असे असताना जैन समाजाकडून तो पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आक्रमक होताना दिसला. यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठक घेतली. कबुतरखाना हटवण्याच्या भूमिकेत मधला मार्ग काढून जनतेच्या आरोग्याचाही विचार करणार आहे. यामध्ये कबुतरांनाही इजा झाली नाही पाहिजे. यादृष्टीने महापालिकेला सर्व खबरदारी घेत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत’, असं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आज जैन समाज आक्रमक झाला त्यांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढली याला माझं समर्थन नाही पण लोकांना आवाहन करेन की, समता ठेवा असं वागणं बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले ते योग्य असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

