Special Report | ‘पोपट’…’क्लायमॅक्स’ आणि ‘पिक्चर’!

आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्यावरील राजकीय लढाई आता फिल्मी डायलॉगवर आलीय. इंटरवल झालेला आहे आणि आता पुढचा पिच्चर संजय राऊतांना सोबत घेऊन मीच दाखवणार असं नबाव मलिक म्हणाले.

आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्यावरील राजकीय लढाई आता फिल्मी डायलॉगवर आलीय. इंटरवल झालेला आहे आणि आता पुढचा पिच्चर संजय राऊतांना सोबत घेऊन मीच दाखवणार असं नबाव मलिक म्हणाले. तर भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकणारच असा इशारा देऊन मलिकांनी भाजपला डिवचलं. “पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करत असतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात. नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही, 100 पेक्षा जास्त लोकांना 26 फर्जी केसेसमध्ये अडकवले आहे, एनसीबीचे अधिकारी फर्जीवडा करून लोकांना अडकवत असेल. हजारो कोटींची खंडणी वसूल करत असेल तर माझं काम आहे, त्यांना अडवले पाहिजे, ते कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत नेईल”, असं नवाब मलिक म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI