मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण
VIDEO | स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज १४० वी जयंती, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशसमध्ये पुतळ्याचं अनावरण
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १४० वी जयंती आहे. त्यानिमित्त मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावर करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन मॉरिशसमध्ये संपन्न होतंय. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी सावरकरप्रेमींमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला.
Published on: May 28, 2023 03:28 PM
Follow Us
Latest Videos
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

