Sanjay Shirsat : एका भावाचं कौतुक, तर दुसऱ्यावर टीका; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर काय म्हणाले शिरसाट?
Sanjay Shirsat Reaction On Thackeray Brothers Melava : मंत्री संजय शिरसाट यांनी आज झालेल्या ठाकरेंच्या मेळाव्यावर भाष्य करत राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टोमणे मारले, त्यांचं भाषण सुरू असताना राज ठाकरे यांचा चेहरा बघा, त्यांच्याकडून टाळी नाही. ते शांत, गंभीर पणे सर्व ऐकत होते, कारण कार्यक्रम मराठी माणसासाठी ठेवण्यात आला होता. त्यांनी बहुदा आधीच स्पष्ट केलं असावं की, मराठी शिवाय कोणत्या मुद्द्यावर बोलणार नाहीय. याला बाणा म्हणतात, असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंचं आणि त्यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. तर उद्धव ठाकरेंवर मात्र यावेळी शिरसाट यांनी निशाणा साधलेला दिसून आला आहे.
ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर बोलताना शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे सर्वांचे मित्र आहेत, त्यांना कधीही कोणीही भेटायला जाऊ शकतं. मात्र यांचं असं नाही. हे दोघे एकत्र आले तर आनंदच. आम्ही 40 चे 60 झालो आहोत. त्यांचा आम्हाला फरक पडणार नाही. हे एकत्र आले तर आम्हाला कौतुक आहे. एकत्र राहा आमचं काही पोट दुखणार नाही. हे सोबत येऊ नये, यासाठी आम्ही काही देव पाण्यात बुडवून बसलेलो नव्हतो. मेळावा चांगला होता, मात्र लोकांचं लक्ष राज ठाकरे काय म्हणतात, याकडं होतं. त्यांनी अतिशय मुद्देसूद आणि संयमी आजच्या मराठी भाषेवर असलेल्या मुद्द्यावर भाषण केलं, असंही शिरसाट यांनी म्हंटलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

