VijayKumar Gavit यांचं महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर, केली दिलगिरी व्यक्त अन् म्हणाले….
VIDEO | ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री विजयकुमार गावित हे बॅकफूटवर, राज्य महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसीला दिलं उत्तर आणि व्यक्त केली दिलगिरी, काय म्हणाले बघा...
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा’, असं वक्तव्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून एकच टीका त्यांच्यावर होत होत्या. दरम्यान, याप्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विजयकुमार गावित यांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली होती. तसेच गावित यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले होते. या नोटीसीवर आता विजयकुमार गावित यांनी उत्तर दिल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी आज ट्विटरवर दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या संबंधित वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर असे सांगितले की, “धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मंत्री गावित यांनी आपला खुलासा सादर करत आपण उपस्थित स्थानिक आदिवासी बांधवांना अहिराणी आणि त्यांच्या स्थानिक भाषेत संबोधन करत होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा वृत्तवाहिन्यांकडून विपर्यास करण्यात आला, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय”.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

