AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'हे नामर्द सरकार, केवळ सत्तेसाठी...', केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर कुणाचा हल्लाबोल?

‘हे नामर्द सरकार, केवळ सत्तेसाठी…’, केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयावर कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Aug 22, 2023 | 7:12 PM
Share

VIDEO | 'खणाऱ्यांचा विचार करता पिकवणाऱ्याचा नाही ही नालायक प्रवृत्ती, हे सरकार नामर्द, केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने निर्णय', केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर कुणाची टीका

पुणे, २२ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीय. हे सरकार नामर्द आहे केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याची जोरदार टीका त्यांनी केलीय. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते मग दर पडल्यानंतर का करत नाही अशा शब्दात कडू यांनी टीका केलीय. खणाऱ्यांचा विचार करता पिकवणाऱ्याचा नाही ही नालायक प्रवृत्ती असल्याची टीका त्यांनी केलीय. कांदा परवडत नसेल तर खावू नये, माझ्याकडे लसूण आहे मुळाही आहे अशा शेलक्या शब्दात कडू यांनी सरकारवर टीका केलीय. कांदा प्रश्नी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले म्हणून तुम्ही येवढे का घाबरता असा सवाल करताना त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मंत्री विजय गावित यांच्या मासे खाण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांची तशी मानसिकता तसे ते बोलल्याचे कडू यांनी म्हटले. तर नवनीत राणा यांना धमकीच्या मुद्द्यावर बोलताना ते कोण महत्वाचे आहे का असा प्रती सवाल करत त्यांनी त्याला फारसे महत्व दिले नाही. पिंपरी चिंचवडमध्ये दीव्यांग विभाग आपल्या दारी या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडमध्ये आले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Published on: Aug 22, 2023 07:12 PM