Bacchu Kadu : जास्त शहाणपणा कराल तर… संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना काय दिली तंबी?
दिव्यांगाचा निधी खर्च का केला नाही, म्हणून आमदार बच्चू कडू यांनी उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी मुख्य अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी या निधी वाटपावरून थेट इशाराही दिलाय
यवतमाळ,८ नोव्हेंबर २०२३ | दिव्यांगाचा निधी खर्च का केला नाही, म्हणून शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी मुख्य अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावले आहे. तीन वर्षांपासून दिव्यांगांचा निधी खर्च का केला नाही, असे म्हणत बच्चू कडू हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. तर दिव्यांगांचा निधी वाटायला जीवावर येते का? असा सवाल बच्चू कडू यांनी त्या अधिकाऱ्याला विचारला. १ लाख पगार घेता पण डोकं लावत नाहीत, असे म्हणत संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतले आहे. जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेल, यानंतर जर कमी निधी दिला तर तिथं येऊन वांदे करेल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

कार विम्यासोबत हवेच हे ॲड ऑन, पैसा वसूल होणार

श्रीमंतांच्या यादीत पुन्हा गौतम अदाणी, एकाच दिवसात मोठी झेप

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारे भारतीय

रणबीर कपूर सोबत इंटीमेट सीन देऊन रातोरात नॅशनल क्रश बनली ही अभिनेत्री

ही 5 लक्षणे दिसताच समजून घ्या तुम्हाला लागले स्मार्टफोनचे व्यसन

बीसीसीआय निवड समितीवर जडेजा भडकला, नक्की कारण काय?
Latest Videos