Suresh Dhas : नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
Suresh Dhas Celebrating Holi : राज्यात सगळीकडे धूळवड आनंदात आणि उत्साहात साजरी होत आहे. राजकीय नेत्यानी देखील रंगांची उधळण करत धूळवड साजरी केली आहे. आमदार सुरेश धस यांनी आज आपल्या निवासस्थानी नैसर्गिक रंग लाऊन धुळवडच्या शुभेच्छा दिल्या.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आज कार्यकर्त्यांसोबत धूळवड खेळण्याचा आनंद लुटला. कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे आणि संतोष देशमुख प्रकरण उचलून धरल्यामुळे धस सध्या चर्चेत आहेत.
होळीनंतर आज राज्यभरात धूळवड साजरी केली जात आहे. रंगांची उधळण करत आनंदात धूळवड साजरी केली जात आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून देखील धूळवड खेळण्यात येत आहे. कार्यकर्ते, कुटुंबीयांना रंग लाऊन नेत्यांनी रंगांची उधळण केल्याचं बघायला मिळालं आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी देखील आज आपल्या आष्टी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांना रंग लाऊन धूळवड साजरी केली. यावेळी कार्यकर्त्यांना नैसर्गिक रंग लाऊन पर्यावरण पूरक धुळवड साजरी केली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
