Suresh Dhas : ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
Beed Bhairavnath Palkhi : आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भैरवनाथांच्या पालखी सोहळ्यात लेझिम खेळून ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.
बीडच्या वाळूंज इथल्या भैरवनाथांच्या पालखी सोहळ्यात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. यावेळी सुरेश धस यांनी पालखी मिरवणुकीत लेझिम देखील खेळली आहे.
बीड जिल्ह्यातील वाळूंज येथे दरवर्षी भैरवनाथांच्या पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील हा सोहळा सध्या पार पडत आहे. यावेळी काल पालखी मिरवणुकीत आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झालेले बघायला मिळाले. यावेळी पालखीचं दर्शन घेतल्या नंतर सुरेश धस यांना पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांनी देखील ढोल वादनाचा आनंद घेतला. तसंच यावेळी धस हे भाविकांसोबत लेझिम देखील खेळताना दिसून आले. लेझिम खेळण्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या धस यांचं एक वेगळं रूप पालखी सोहळ्यात सगळ्यांना बघायला मिळलं.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

