Prakash Mahajan : प्रकाश महाजन मनसेत नाराज? चर्चांनंतर अमित ठाकरेंचा फोन; म्हणाले, तुम्ही मीडियाकडे का गेलात..
मला वाटतं की अमित ठाकरे यांच्यासारखे नव्या विचाराचे नेते जर असतील तर नक्की राजकारणात सभ्यतेचे आणि सज्जनतेचं पर्व सुरु होईल. ते माझ्या मुलापेक्षाही लहान आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.
मनसे नेते, प्रवक्ते प्रकाश महाजन यांना इगतपुरी येथील पक्षाच्या तीन दिवसीय शिबिरासाठी बोलवलं नसल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. मनसेत आता दिवाळी आहे पण माझ्या घरात अंधार आहे, असं म्हणत टिव्ही ९ शी बोलताना महाजनांनी आपली खंत व्यक्त केली. तर माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटले. प्रकाश महाजन हे नाराज असल्याची चर्चा होत असताना मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी फोन केल्याची माहिती महाजन यांनी स्वत: दिली आहे.
महाजन म्हणाले, ‘मला काल रात्री अमित ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझी चौकशी केली. त्यांची थोडी नाराजी होती की मी आधी मीडियाकडे का गेलो, मी म्हटलं मी गेलो नाही मीडिया माझ्याकडे आले होते. माझा थोडा भावनेचा बंध फुटला. पण त्या व्यक्तीने माझी आस्थेवाईक पद्धतीने चौकशी केली मला या गोष्टीचे समाधान वाटलं आणि मानसिक आनंद झाला की इतक्या मोठ्या नेत्यांचे चिरंजीव असून त्यांनी मी तुम्हाला भेटायला येतो.’ पुढे ते असेही म्हणाले, मी त्यांना म्हटलं की तुम्ही भेटायला येण्याची गरज नाही, मला बोलवा मी येतो. जे झालं ते चांगलं झालं नाही. पण पक्षात सुधारणा व्हावी, काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी, हाच त्यामागील उद्देष होता.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

