मग पुन्हा उपोषण का? जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांचा थेट सवाल
विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला? असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला. तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवालही त्यांनी जरांगेंना केलाय
नाशिक, २ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. सगळ्या मागण्या मान्य झाल्यात पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही. विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगे पाटील यांना कोणता विजय मिळाला? असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला. तर आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी? असा सवालही त्यांनी जरांगेंना केलाय. येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणा बसणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली. यावर राज ठाकरे म्हणाले, लोकांसमोर मी सांगितलेल हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीरबाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकर घेऊ शकणार नाही, त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाव लागेल. तर मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधवांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? असा सवालही त्यांनी केला.
Published on: Feb 02, 2024 02:51 PM
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
