हिंदुत्व रक्तात असेल तर…, मनसे नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा
VIDEO | मुंब्र्यातील मशीद हटविली नाही तर..., मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा इशारा
ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदीची नोटीस बजावण्यात आली. मुंब्रा डोंगरावरची मशीद हटवण्याच्या अल्टिमेटमनंतर अविनाश जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली. यामध्ये अविनाश जाधव यांना २७ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत मुंब्र्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावरची मशीद हटवण्यासाठी अविनाश जाधव यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या अल्टिमेटमनंतर कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी अविनाश जाधव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा हिंदुत्व जर सरकारच्या रक्तात असेल तर मुंब्र्यातील अनधिकृत दर्गा हटवावा, असा इशारा सरकारला दिला आहे. यासह जर सरकारने मुंब्र्यातील अनधिकृत मशीद हटविली नाही तर त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर उभारू असेही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात

