‘तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कानाखाली आवाज काढेल’, मनसे नेत्यानं कुणाला काय दिला इशारा?
VIDEO | 'आंदोलन कसं करावं हे रविंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिकवू नये', मनसे नेते संदीप देशपांडे यांची बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडल्याने मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून राज्यभरात सात टप्प्यांमध्ये जागर यात्रा मनसेकडून काढण्यात येणार आहे. या यात्रेला आजपासून सुरूवात करण्यात येत आहे. यादरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. रविंद्र चव्हाण यांनी मनसे नेत्यांनी आंदोलन करावं पण त्याचा कुठेही अडथळा येऊ नये, असे म्हटले होते. यावरच संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला सांगू नये आम्हाला कसं आंदोलन करायचं ते आम्हाला माहिती आहे कुठे कुठल्या पद्धतीने आंदोलन करायचं हे त्यांच्याकडे शिकण्याची गरज नाही’, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडे… रस्ता बनवता येत नसेल असे स्पष्ट सांगा आम्हाला दोष देऊन याच्या पाठी लपवू नका असं रवींद्र चव्हाण यांना माझं सांगणं आहे. झालेल्या कामा मध्ये भेगा पडलेल्या आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण मुळे झालं आहे का….? का भिकारी कॉन्ट्रॅक्टदारामुळे झालं हा प्रश्न विचारायला नको…? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

