BIG Breaking : हिंदी सक्तीविरोधातील राज ठाकरेंच्या मोर्चाच्या तारखेत बदल, नेमकं कारण अन् नवी तारीख काय?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपआपल्या आंदोलन, मोर्च्याची घोषणा केली आहे. मनसेकडून 5 जुलैला मोर्चा आणि 29 जून आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित मोर्चात सहभागी होणार आहेत,
हिंदी सक्तीच्या सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील मोठी घोषणा केली होती. मात्र या मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मनसेने आपल्या मोर्चाची तारीख आता बदलली असून 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी हा मोर्चा होणार आहे. 6 जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथून सकाळी 10 वाजता मोर्चा आयोजित केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मनसेने आपल्या मोर्चाची तारीख बदलली आहे.
तर दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला आहे की, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन मोर्चे किंवा आंदोलनं नको तर एकच मोर्चा निघालाय हवा, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेच्या मोर्चात सहभागी व्हावं, असा प्रस्ताव मनसेकडून ठाकरेंच्या सेनेला पाठवण्यात आला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

