शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक
आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.
डोंबिवली : जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला (Farmer Family) बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे घडली आहे. या मारहाणीत शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. तर महिलांसोबतही धक्काबुक्कीही करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला जात नसल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात ठाण मांडले. यावेळी आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील (Raju Patil) यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय

