MNS : मध्यरात्रीपासून ते दुपारी 4 पर्यंत मनसेच्या मोर्चात काय घडलं? मीरारोडचं वातावरण कसं तापलं?
मराठीच्या मुद्द्यावरू मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि एकीकरण समितीचा मोर्चामध्ये सहभाग होता. आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलकांच्या ठाम भूमिकेनंतर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली.
मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे,ठाकरे यांची शिवसेना मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता. दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकरल्यामुळे संबंधितांना नोटीसा पाठवण्यात आल्या. तर मध्यरात्री साडे तीन वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई झाली तरी मराठीसाठी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेतला. पोलिसांनी मोर्चास्थळी येणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं. यावेळी मराठी मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत चांगलीच बाचाबाची आणि वादही झाला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईमध्ये महिला, मराठी माणसांसह मनसैनिकांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बघा स्पेशल रिपोर्ट मीरारोडच्या मोर्चात नेमकं काय-काय घडलं?

