AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर्ग्यावरून राज ठाकरेंना डिवचत सामनात अग्रलेख

दर्ग्यावरून राज ठाकरेंना डिवचत सामनात अग्रलेख

| Updated on: Mar 23, 2023 | 8:19 AM
Share

आज जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या दर्ग्याची पाहणी करून तिथले अनधिकृत बांधकाम तोडणार आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(22 मार्च) दादरच्या मैदानावर गुढीपाडवा मेळावा घेत अनेकांची चिरफाड केली. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हीडिओची झलक पुन्हा दाखवली. तर माहीमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आज जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या दर्ग्याची पाहणी करून तिथले अनधिकृत बांधकाम तोडणार आहेत. मात्र यानंतर आता याच दर्ग्यावरून सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांना डिवचले आहे. तर त्यांचा हा दावा आजचा काही नवा नसल्याचेही म्हटलं आहे.

माहीमच्या खाडीत हजरत ख्वाजा खिज्र हयातून नबी चिल्ला या ट्रस्टला अवघ्या दोन दिवसात वक्फ बोर्डाने माहीमच्या भरसमुद्रात परवानगी दिली होती. त्यानंतर दैनिक सामनामध्ये 19 ऑगस्ट 2007 रोजी माहीमच्या समुद्रावर हिरवा झेंडा ही बातमी आली होती. तसेच हा हिरवा झेंडा समुद्रात फडकवल्याचा फोटोही छापण्यात आला होता. म्हणजे या समुद्रात भराव करण्यास वक्फने ट्रस्टला परवानगी दिली होती.

Published on: Mar 23, 2023 08:19 AM