Shivsena : ठाकरे बंधूंची जवळीक अन् शिंदेंना फटका? शिवसेनेतल्या पक्षप्रवेशांना ब्रेक?
ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. शिवसेनेत होणारे प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माझी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबल्याची माहिती समोर येत आहे.
एका महिन्यात ठाकरे बंधूंच्या दोन वेळा भेटी झाल्यात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. दर आठ ते पंधरा दिवसांनी होणारे पक्षप्रवेश सध्या थांबले असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला होता. त्यामुळे पक्षातली गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर होतं.
दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. दोन ठाकरे एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याच्या विचारात असलेल्या माजी नगरसेवकांनी आणि स्थानिक नेत्यांनी सध्या सावध भूमिका घेतली आहे. त्यातूनच ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याचही चर्चा होतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

