Raj Thackeray : महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा… राज ठाकरे यांचं CM फडणवीस यांना पत्र, राज्यातील मुली बेपत्ता प्रकरणी चिंता व्यक्त
राज्यामध्ये लहान मुलांच्या अपहरणाचा वाढता प्रश्न चिंताजनक बनला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात पत्र लिहून विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लहान मुले पळवणाऱ्या टोळ्यांबाबत आणि बेपत्ता मुलांच्या वाढत्या प्रमाणाबाबत पत्र लिहिले आहे. या प्रश्नाची गंभीरता दिवसेंदिवस वाढत असून, एनसीआरबीच्या अहवालानुसार २०२१ ते २०२४ या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी सरकारला याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. केवळ अधिवेशनात आणि सभागृहात चर्चा न करता, प्रत्यक्षात कृती करून या समस्येवर काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर भीक मागताना दिसणाऱ्या लहान मुलांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील असल्याने, दोन्ही खाती सांभाळत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी आणि केवळ चर्चेत न थांबता प्रभावी कृती करावी, अशी त्यांची मागणी आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि कशी अंमलबजावणी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ

