राज ठाकरेंचा आरक्षणावरून मराठवाड्यातील सभेतून मनोज जरांगे पाटलांना सवाल, ‘आरक्षण कसं मिळेल?’
मराठवाड्यातील सभेत राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर तुम्ही आरक्षण कसं देणार आहात? असा सवाल केलाय. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी नवीन ठेका राज ठाकरेंना दिलाय का? असा प्रतिप्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
मराठवाड्यातील सभेत राज ठाकरेंनी पुन्हा आरक्षणाचा विषय छेडत मनोज जरांगे पाटील यांना सवाल केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले किंवा पाडापाडी केली. तरी आरक्षण कसं मिळणार? याचं उत्तर द्यावं असं आव्हान राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांनी दिलं. तर जेव्हा लढा सुरू होता तेव्हा झोपेत असणारे राज ठाकरेंना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी नवा ठेका दिलाय का? असं उत्तरच मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना दिलंय. याआधी राज ठाकरेंनी राज्यातील संसाधनं नीट वापरली तर रोजगार निर्माण होऊन कोणालाच आरक्षणाची गरज लागणार नाही, असं वक्तव्य केले होते. यावेळी केंद्रात आणि राज्यात नोकऱ्या आहेत कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर केलाय. बघा काय म्हणाले राज ठाकरे आणि त्यावर मनोज जरांगे पाटलांनी काय पलटवार केलाय?
Published on: Nov 07, 2024 10:39 AM
Latest Videos