Raj Thackeray : फडणवीस नागपूरचे… मुंबईकरांना काय हवंय? यासाठी मुंबईत जन्माला… राज ठाकरे यांचा CM फडणवीसांवर निशाणा
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर मुंबईच्या प्रश्नांबाबत टीका केली. मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, असे ते म्हणाले. अजित पवारांवरील घोटाळ्याचे पुरावे फडणवीसांनी आता का दिले नाहीत, असा सवाल करत राज ठाकरेंनी पन्नास खोके आणि कन्फ्युजन-करप्शन युतीवरही निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत मुंबईच्या समस्या समजून घेण्यासाठी मुंबईतच जन्माला यावे लागते, असे विधान केले आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सामनामधील मुलाखतीवेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरेंनी अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता का दिले जात नाहीत, असा सवाल फडणवीसांना केला. ते म्हणाले की, पन्नास खोके हा विनोद नाही, तर हा 40 आमदारांसाठी 2000 कोटींचा घोटाळा आहे. तसेच, महायुतीला कन्फ्युजन आणि करप्शनची युती असे संबोधत एकाला कन्फ्युज आणि दुसऱ्याला करप्ट लोकांचा नेता म्हटले. हा संघर्ष महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले

