Raj Thackeray : युतीच्या चर्चा पत्रकारांशी करायच्या का? राज ठाकरे भडकले, FB पोस्टमधून नेमकं काय म्हटलं?
'अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे', असं राज ठाकरे म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणाऱ्या चर्चा होताना दिसताय. अशातच मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित झालेला विजयोत्सव मेळावा त्याला कारणीभूत ठरत आहे. या मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल बोललं जात आहे. दरम्यान, या युतीसंदर्भात माध्यमांवर सातत्याने बातम्या दाखवल्या जात असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांवरच संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांची एक पोस्ट सध्या समोर आली आहे.
‘१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं. त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? ‘, असं राज ठाकरे म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

