Thackeray Brothers : ठरलं.. राज-उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला मुंबईत मोर्चा, हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्रित दिसणार!
‘महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे. इतकंच नाहीतर त्यासोबत उद्धव व राज ठाकरे यांचा एकत्र फोटोही शेअर केलाय.
हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहे. मनसेकडून काढण्यात 5 जुलै रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरूवातीला राज ठाकरेंनी 6 जुलैची घोषणा केली होती मात्र आषाढी एकादशी असल्याने त्यात बदल करून 5 जुलै ही मोर्चाची तारीख ठरवण्यात आली आहे तर उद्धव ठाकरे देखील 7 जुलै रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला असून त्या मोर्चात ते सहभागी होणार होते.
यानंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन आंदोलनं न करता एकच मोर्चा निघालाय हवा, यासाठी ठाकरेंच्या सेनेने मनसेच्या मोर्च्यात सहभागी व्हावं असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यासंदर्भात हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं संजय राऊतांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधून हिंदी सक्तीविरोधातील मोर्चामध्ये एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे.
Published on: Jun 27, 2025 01:13 PM
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
