Worli BDD Chawl : राज ठाकरे यांनी केली पुतण्याच्या मतदारसंघातील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दौरा केला. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील वरळी बीडीडी चाळीला भेट दिली. बीडीडी चाळीचं काम सुरु असताना या कामाची पाहणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दौरा केला. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील वरळी बीडीडी चाळीला भेट दिली. बीडीडी चाळीचं काम सुरु असताना या कामाची पाहणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत या समस्या घेऊन अनेक वेळा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर स्वतः राज ठाकरेंनी आज वरळी बीडीडी येथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, जवळपास २० मिनिटं त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा असल्याने राज ठाकरे तेथे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

