Raj Thackeray : चिमुकला मनसैनिक गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचतो तेव्हा..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर गर्दी केली आहे.
आज देशभरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने आणि गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक पोस्ट, स्टेटस आणि व्हिडीओ शेअर केले जात असून, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही आपल्या राजकीय गुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात जाऊन गुरुवंदन करत आहेत. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल झाले. यंदा गुरुपौर्णिमा आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्राबाहेर असलेल्या राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. राज ठाकरे यांनीही सर्वांना भेटून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

