MNS YES Bank : येस बँकेत मनसेचा राडा, अधिकाऱ्याला फटकावलं; नागपुरात नेमकं घडलं काय?
येस बँकेकडून जेसीबी धारकला कर्ज देण्यात आले होते मात्र त्यानंतर जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं येस बँकेकडून त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, येस बँकविरोधात मनसेने एक आक्रमक पाऊल उचलत अधिकाऱ्यालाच धुतल्याचे पाहायला मिळाले.
नागपूरमधील येस बँकेच्या एका अधिकाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका ग्राहकाची फसवणूक झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने बँकेकडून जेसीबी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं होतं. कर्जाचे काही हप्ते थकल्यामुळे बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची जेसीबी जप्त केली आणि परस्पर विकली, असा आरोप मनसेने केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वाखाली माऊंट रोडवरील येस बँकेच्या शाखेत जोरदार आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी येस बँकेच्या पाटीला काळं फासलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर, कार्यकर्त्यांनी या प्रकरणाशी संबंधित एका कनिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, मात्र त्यांच्या समोरच हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

