मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत

केंद्र सरकारने (Central Government) आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवर (Sugar Exports) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs) ही माहिती दिली आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 25, 2022 | 11:49 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central Government) आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवर (Sugar Exports) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs) ही माहिती दिली आहे. साखरेचा हंगाम 2021-22 (ऑक्टोबर-सप्टेंबर)च्या काळात साखरेच्या घरगुती उत्पादनाची उपलब्धता आणि मूल्य स्थिरता ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत साखरेच्या निर्यातीला रेग्युलेट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 100 लाख मॅट्रिट टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. वाढती महागाई आणि खाद्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. या पूर्वी देशांत गव्हाची भाव वाढल्याने केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें