मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी माफी मागणे हे महत्वाचे…शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळ जनक वक्तव्य
शिंदे गटाचे नेते एकामागून एक अशा प्रकारची वक्तव्य करीत आहेत की स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहेत. आता शिंदे गटाच्या नेत्याने एक विचित्र प्रतिक्रीया दिली आहे.
महाराजांबाबत एवढे राजकारण करायची काय गरज आहे. राजकारण थांबले पाहीजेत ना…महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली म्हणून विरोधक धास्तावले आहेत. महापुरुषांबाबत अशी घटना दुर्देवी आहे.परंतू त्यावर देशाचे पंतप्रधानांना माफी मागितली आहे. मोदी सारख्या नेत्याची जगभर प्रतिमा आहे. त्याबद्दल संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया चुकीची आहे. कारण मोदी आता सत्तेवर आहेत. त्यांना एका राज्याने काही फरक पडणार नाही. त्यांनी जर मोठ्या मनाने महापुरुषाची माफी मागितली तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे वक्तव्यं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केले आहे. कॉंग्रेसचे लांगूलचालन करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने सावकरांचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News