Mohit Kamboj, Rashmi Shukla हे Devendra Fadnavis यांच्या भेटीला

आरोप झाल्यानंतर शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शुक्ला पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ पदावर येण्याची शक्यता आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 17, 2022 | 11:20 PM

मुंबई : मोहित कंबोज, रश्मी शुक्ला, मनोज कोटक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.  देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फडणवीसांची भेट घेतली. रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात परतणार ? असा सवाल उपस्थित होतोय. सध्या रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखल झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणात त्या आरोपी आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतो हा अहवाल त्यांनी तयार केला होता. हा अहवाल लिक झाल्याने रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले. फडणवीस सरकारच्या काळात रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. आरोप झाल्यानंतर शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शुक्ला पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ पदावर येण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या भेटीला रश्मी शुक्ला आल्याने तशी चर्चा होत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें