‘कितीही खोके, बोके करा, पण सरकार स्थिर’; शिवसेना नेत्याची विरोधकांवर खरमरीत टीका
याचदरम्यान ते विरोधकांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. याच्या आधी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून 50 खोके अकदम ओके, अशी घोषणा दिल्या जात होत्या.
मुंबई, 18 जुलै 2023 | राज्याचे पावसाळी अधिवेशन हे भाजप नेते किरीट सोमय्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर सध्या केंद्रीत झाले आहे. याचदरम्यान ते विरोधकांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. याच्या आधी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून 50 खोके अकदम ओके, अशी घोषणा दिल्या जात होत्या. मात्र आता सत्तेत अजित पवार गट सामिल झाल्याने यात बदल झाला आहे. यावेळी सभागृहाच्या पायऱ्यांवर खोके गेले, बोके गेले; 50 खोक्यांवर खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या जात आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आता विरोधकांकडे बोलण्यासाठी काहिच राहिलेलं नाही. त्यामुळं त्यांना अशा घोषणा द्याव्या लागतात. तर कितीही खोके, बोके करा, पण सरकार स्थिर असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तर विरोधकांनी आधी नीट रहा, नीट वागा दुसऱ्यावर काय आरोप करता असा सवाल केला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

