Sanjay Raut यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा : Navneet Rana यांची मागणी

संजय राऊत यांच्या विरुद्ध अॅक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 26, 2022 | 8:13 PM

नागपूर : संजय राऊत यांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत 20 फूट खड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा वापरली होती. संजय राऊत यांच्यावर 153(A),294,506 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी युवा स्वाभिमानच्या वतीनं नागपूर पोलीस आयुक्त (Commissioner of Police) अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांना निवेदनातून व लेखी तक्रारीतून केली आहे. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या आहेत. खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅक्ट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी तक्रार नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना सोपविली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें