Supriya Sule Meet HM | सुप्रिया सुळे गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली.

महाराष्ट्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाडनंतर आता कोल्हापूर आणि सांगळीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली. त्यावेळी अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI