‘हा राजकीय भूकंप नाही, भाजपची नीच खेळी’; शिवसेना नेत्याचा भाजपवर हल्लाबोल
त्यानंतर पुन्हा अशीच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट तयार झाले. त्यातील अजित पवार गट भाजप-शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामिल झाला. हा दुसरा भूकंप मानला जात आहे.
अमरावती : राज्यात दोन मोठे भूकंप झाले. एक शिवसेना फुटून शिंदे गट तयार झाला. जो भाजपशी हाथ मिळवणी करत सत्तेत आला. त्यानंतर पुन्हा अशीच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट तयार झाले. त्यातील अजित पवार गट भाजप-शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामिल झाला. हा दुसरा भूकंप मानला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी हा राजकीय भूकंप नाही. तर भाजपची नीच खेळी असल्याचा टोला भाजपला लगावला आहे. तर पक्षांची पळवा पळवी आणि फोडाफोडी अशी घाणेरडी राजकीय खेळी भाजपकडून खेळली जात आहे. तर जे ब्रिटिशांना सुद्धा जमलं नाही ते सध्या भारतीय जनता पक्ष करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

