वर्तमान पत्रात वाचलंय मी… छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
मंत्री छगन भुजबळ यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय पक्षांच्या सहभागावर टीका केली आहे. अराजकीय संस्थांच्या मागण्यांमध्ये राजकारण आणू नये, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावाही भुजबळांनी केला. गैर-राजकीय प्रश्नांवर सर्वांनी मिळून तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एमपीएससी परिक्षांबबात सध्या राज्यभर चर्चा आहे. याबबात आता मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे. ‘एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप टाळावा’, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. अराजकीय संस्थांच्या कामात राजकारण आणू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधकांचा सहभाग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी ही टीका केली आहे. सरकारने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भुजबळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या ज्या गैर-राजकीय मागण्या आहेत, त्यात राजकारण आणि इतर विषयांची भेसळ होऊ नये. कारण राजकारण हे राजकीय दृष्टीने पाहिले जाते आणि सरकारही त्याच दृष्टिकोनातून पाहते.
राजकीय पक्षांना लोकशाहीने मोर्चा काढण्याचा अधिकार दिला असला तरी, अराजकीय संस्थांचे प्रश्न राजकारणाशिवाय सर्वांनी मिळून सोडवले पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे आता अशा गैर-राजकीय प्रश्नांमध्ये अनावश्यक राजकीय हस्तक्षेप टाळून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे, असे भुजबळ यांनी अधोरेखित केले.
Published on: Sep 11, 2026 01:20 PM
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..

